नवी दिल्ली (हिं.स) : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांसह झोजिला आणि झेड-मोर बोगद्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यासोबत नितीन गडकरींनी औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणा कामांसंदर्भात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, तसेच शक्यतो भूसंपादन न करता अथवा भूसंपादनाची किंमत कमी करून उपलब्ध रुंदीत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकारी- मान्यवरांनी राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधीत विषयांवर चर्चा केली.