Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पुण्यात 'बीए.२' रुग्णांची संख्या सर्वाधिक

पुण्यात 'बीए.२' रुग्णांची संख्या सर्वाधिक

पुणे (हिं.स.) : पुणे शहरात आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ‘बीए.२’ या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या उपप्रकारचे बहुतांश रुग्ण आहेत. या विषाणूच्या संसर्गाचा दर जास्त असला तरीही त्यातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटपासून पुन्हा बदल होऊन ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ उपप्रकारच्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या आठ रुग्णांचे पुण्यात निदान यापूर्वी झाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे.

निदान झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा नेमका कोणता व्हेरियंट आहे, याचे निदान करण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) करण्यात येते. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा