Sunday, July 6, 2025

११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक

११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक

मुंबई (हिं.स.) : ५०.८८ कोटींची खरेदी दाखवून ११.१९ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे. जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल, (४२), घाटकोपर यांना मंगळवारी अटक केली.


अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


या कारवाईत अन्वेषण–अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर, संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे, नामदेव मानकर सहभागी झाले होते. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी १९ जणांना अटक केली आहे.

Comments
Add Comment