
मुंबई (हिं.स.) : अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात अपेक्षित होते. परंतु, त्याऐवजी अनिल परब शिर्डीला रवाना झाले. शिर्डीत जाऊन त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
परब यांना बुधवारी ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनिल परब हे चौकशी टाळून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. परब शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी परबांवर मनी लाँडरिंगचा आरोप करत पुरावे ईडी कार्यालयाकडे सोपवले होते.
दापोली इथे परबांचा बेकायदेशीर रिसॉर्ट असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर धाडी पडल्या. परब यांना ईडीने समन्स देत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.