
मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जामीन अटींचा भंग केल्याप्रकरणी जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने २७ जूनला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे.