नवी दिल्ली (हिं.स) : विशेष आसियान-भारत परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक आणि दिल्ली डायलॉग XII साठी इंडोनेशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री रेत्नो मार्सुडी यांचे बुधवारी नवी दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले. ही यात्रा आणि कार्यक्रम व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याची संधी आहे अशा भावना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी व्यक्त केली. यासोबत आसियानचे सरचिटणीस दातो लिम जॉक होई यांचेही भारतात आगमन झाले.
स्पेन परराष्ट्र मंत्री
भारत आगमनावर स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोसे मॅन्युएल अल्बेरेस यांचे पहिल्या अधिकृत भेटीवर हार्दिक स्वागत करण्यात आले. या भेटीमुळे भारत- स्पेन बहुआयामी भागीदारी आणखी मजबूत होईल असे ट्वीटर द्वारे अरिंदम बागची म्हणाले.