Monday, August 25, 2025

राज्यात ४०२४ कोरोना बाधित

राज्यात ४०२४ कोरोना बाधित

मुंबई : राज्यात आज ४०२४ कोरोना बाधित नवीन रुग्णांचे निदान झाले असून दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १९२६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ३०२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१४,२८,२२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१९,४४२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी ४ रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत.

यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णांची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment