Thursday, August 14, 2025

जीपीओ कार्यालयातील पार्सलमध्ये स्फोट

जीपीओ कार्यालयातील पार्सलमध्ये स्फोट

नागपूर : नागपूरच्या मुख्य टपाल कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी एका पार्सलमध्ये छोटा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली होती. सदर पार्सल जप्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


जीपीओमध्ये रेल्वे मेल सर्व्हिसचे पार्सल हब आहे. तिथे नाशिकहून बुक झालेल्या एका पार्सलमध्ये स्फोटके आढळले. त्याचा स्फोट झाल्याने धूर निघाला यायला लागला. ते पाहून टपाल कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. नाशिकमधील एका पोलीस अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटके जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे.


हा स्फोट मोठा नसला तरी पोस्टात आलेल्या एका पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. स्फोट झालेले पार्सल नाशिकवरून आले होते. जनरल पोस्ट ऑफिसपासून जवळच अनेक मंत्र्यांचे बंगले आणि महत्त्वाच्या खात्याची कार्यालये आहेत. शिवाय जूने आमदार निवास तसेच विधानभवनही जवळच आहे.


सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पथक तसेच बॉम्ब शोधक घटनास्थळी पोहोचले आहे. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी वापरले जाणारे अल्प ते मध्यम प्रतीची स्फोटके या पार्सलमध्ये आढळून आली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >