Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीलग्नाविना जन्मलेल्या संततीचा पित्याच्या संपत्तीत हक्क

लग्नाविना जन्मलेल्या संततीचा पित्याच्या संपत्तीत हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासीक निर्वाळा

नवी दिल्ली (हिं.स.) : स्त्री-पुरुषाने लग्नाविना एकत्र राहून (लिव्ह-इन-रिलेशन) जर अपत्याला जन्म दिला. तर अशा संततीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क असल्याचा ऐतिहासीक निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. याप्रकरणी केरळ हायकोर्टाचा निकाल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहात असतील तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्माला आलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.

केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. तो म्हणाला होता – त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा दिला जात नाही. केरळ हायकोर्टाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्कदार समजता येणार नाही. त्यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी झालेल्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, त्याच्या जन्मदात्यांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे दीर्घकाळ एकत्र राहात होते. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता दिली. यासोबतच घरगुती हिंसाचार कायदा २००५ च्या कलम २ (एफ) मध्ये लिव्ह इन रिलेशन देखील जोडण्यात आले आहे. म्हणजेच लिव्ह-इनमध्ये राहणारे जोडपे घरगुती हिंसाचाराचा अहवालही दाखल करू शकतात. लिव्ह इन रिलेशनसाठी जोडप्याला पती-पत्नी सारखे एकत्र राहावे लागते, परंतु यासाठी वेळेची मर्यादा नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -