Friday, June 20, 2025

पंढरपूरसाठी अतिरीक्त १०० बसेस सोडण्याचा निर्णय

पंढरपूरसाठी अतिरीक्त १०० बसेस सोडण्याचा निर्णय

पुणे (हिं.स.) एसटी महामंडळाने यावर्षी पंढरपूरसाठी अतिरीक्त १०० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता या अतिरिक्त बसेस पुणे विभागातून सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर राणवरे यांनी दिली.


पायी वारीत करोनामुळे सलग दोन वर्षे खंड पडला. एसटी शिवशाही बसने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. यावर्षी शासनाकडून आषाढी वारीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त ४२५ ते ४३० बसेस सोडण्यात येतात. यावर्षी संख्येत वाढ करण्यात येणार आहे. पुणे विभागातून ५३० बसेस सोडण्याचे नियोजन आहे. यावर्षी आषाढी एकादशी १० जूलै रोजी आहे. त्यामुळे ६ जूलैपासूनच स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या स्थानकांतून बसेस सोडण्यात येणार आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >