Monday, November 17, 2025

रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण प्रक्रिया पूर्ण

रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण प्रक्रिया पूर्ण

सोलापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेला जवळपास १२ तास लागले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेपण प्रक्रिया पार पडली.

पुढील दोन दिवस रुक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे. रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येऊन मूर्तीची पाहणी केली होती.

त्यानंतर शनिवारी रात्री मूर्तीच्या चरणावर वज्रलेपण प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सीचा सिलिकॉन लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment