Friday, October 24, 2025
Happy Diwali

गांधी कुटुंबाने २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला-देवेंद्र फडणवीस

गांधी कुटुंबाने २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला-देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली आहे. परंतु, संपूर्ण देशभरात आंदोलने करून देशातील जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. एजीएल ही कंपनी १९३८ मध्ये तयार झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चे वृत्तपत्र असावे म्हणून स्वातंत्र्यसेनानींनी एजीएलची स्थापना केली होती. ही राष्ट्रीय संपत्ती असून खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये राहुल गांधी कुटुंबाने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि एजीएलची संपत्ती यंग इंडियाला ट्रान्सफर केली. काँग्रेसने चौकशीचा बाऊ करण्याऐवजी चौकशीला सामोरे जायला हवे होते असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर ईडीने राहुल गांधी यांची चौकशी केली. काँग्रेसने याचा बाऊ करण्यापेक्षा चौकशीला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडप करणे गुन्हा आहे. परंतु, हा गुन्हा गांधी कुटुंबाने केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Comments
Add Comment