मुंबई : राज्यात आज १८८५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. आज रोजी एकूण १७४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७७,४७,१११ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,४६,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१२,४६२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात बी.ए. ४ चे तीन आणि बी ए.५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला
मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी ए.५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ याकालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षाच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहे्त. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असून या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत.