Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीपवारांचा कौतुक करतांना निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही - बच्चू...

पवारांचा कौतुक करतांना निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही – बच्चू कडू

अमरावती (हिं.स.) अपक्ष आमदरांना बदनाम करून चालत नाही मोठ्या पक्षाने सुद्धा नियोजन चुकले, अपक्ष आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सपोर्ट करणार होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं ते ठेवल्या गेलं नाही. तसंच मोठ्या नेत्यांच पाठबळ असल्याशिवाय ते अपक्ष आमदार फुटले नसल्याचं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.तसंच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचा जे कौतुक केलं त्यात कौतुक करण्यासारखा प्रकार त्याठिकाणी झालेला नाही, पवारसाहेब जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने समोर जायचे असेल असा अंदाजही आमदार बच्चू कडू यांनी लावला.

शरद पवार यांनी राज्यसभेच्या निकालावर भाष्य करताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ते म्हणाले, ‘सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावा लागेल, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचं पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘संजय राऊतांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेलच ते शोधले पाहिजे, या निवडणुकीत सगळ्यांनी आपआपलं पाहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा पराभव झाला’ असल्याचंही ते म्हणाले.दरम्यान, संजय राऊत यांनी काल अपक्ष आमदारांचा घोडेबाजार झाला म्हणत त्यांनी अपक्ष आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत गद्दारी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सर्वच अपक्ष आमदारांचा अपमान केला आहे. शिवाय आपण पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबत आहोत त्यामुळे आमच्यावर केलेला आरोप म्हणजे सर्वच अपक्ष आमदारांचा अपमान असून सर्व अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -