Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

राज्यात दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू

राज्यात दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचे १६,३७० रुग्ण सक्रिय असून राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी ही २,९४६ एवढी आहे. तर रविवारी राज्यात कोरोनाचे दोन रुग्ण दगावले असल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील सगळ्यात जास्त आकडेवारी ही मुंबई शहरात असून १०,८८९ रुग्ण हे एका मुंबईत आहेत, तर याआधी १९,५७३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४३२ जणांना डिस्जार्ज मिळाला आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २९४६ नवे रुग्ण राज्यात झाले आहे. तर आरोग्य विभागाने ८,१३,२१,७६८ रुग्णांची टेस्ट केली होती. त्यापैकी ७९,१०,५७७ रुग्णांची टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आले आहे.

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १६,३७० इतकी झाली आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त ही मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही ही संख्या मोठी वाढत आहे. मुंबईनंतर ठाण्याचा कोरोना रुग्णांमध्ये क्रमांक लागत असला तरी, त्यानंतर पुण्याचा नंबर लागत आहे. आजचा पुण्यातील आकडा ११२८ इतका आहे.

Comments
Add Comment