Friday, January 16, 2026

लोअर परळ येथील पुल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला

लोअर परळ येथील पुल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (प्रतिनिधी): गिरणगावातील चाकरमान्यांना सोयीचा असलेल्या लोअर परळ (ब्रिज )पुलाचे मंगळवारी लोकार्पण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जुलै २०१८ मध्ये हा पूल धोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यानंतर पाडकाम करून पुलाची उभारणी १० महिन्यात करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. पण लॉकडॉऊनमुळे या पुलाचा कामामध्ये विलंब झाला. या पुलाची रचना ९० मीटर लांब आहे. या पुलासाठी वापरण्यात आलेल्या गर्डरचे वजन १,००० टनांपेक्षा जास्त आहे.

भारतमाता सिनेमाकडून लोअर परळ रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना हा पुल बंद असल्याने वरळी नाका, एल्फीन्सटन रोडच्या दिशेने जाता येत नव्हते. मध्य मुंबईतील हा पुल बंद असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली दिसून येत होती. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment