Sunday, October 26, 2025
Happy Diwali

जनतेला लुटण्याचे काम ठाकरे-पवार सरकार करत आहे -किरीट सोमय्या

जनतेला लुटण्याचे काम ठाकरे-पवार सरकार करत आहे -किरीट सोमय्या

पुणे (हिं.स.) महाराष्ट्रात रावण मुख्यमंत्री होऊन बसले असल्यामुळे त्यांना हनुमान चालीसा म्हणणा-यांची भीती वाटत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचे काम ठाकरे- पवार सरकार करत असून महाराष्ट्रातील जनताच आता सरकारची लंका जाळणार असल्याचा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.

लोहगाव येथील भाजपचे माजी उपसरपंच सुनील खांदवे-मास्तर यांनी वारकऱ्यांसाठी रेनकोट, तंबूचे वाटप तसेच विविध कोर्सचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले, हनुमान चालीसा म्हणणारा जेलमध्ये जातो आणि दाऊदचा हस्तक मात्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो.

मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व गहाण ठेवले असून सचिन वाजे हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे आता अनिल परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचेदेखील नाव वसुली प्रकरणात येऊ शकते. त्यामुळे त्यांना भिती वाटत आहे.

Comments
Add Comment