नवी दिल्ली (हिं.स.) : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज, रविवारी कोरोना संबंधित त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली.
यासंदर्भात सुरजेवाला यांनी सांगितले की, गेल्या २ जून रोजी सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या आपल्या निवासस्थानी क्वॉरंटाईन झाल्या होत्या. गृहविलगीकरणात त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत होती. परंतु, त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात भर्ती करण्यात आल्याचे सुर्जेवाला यांनी सांगितले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना ८ जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण, ईडीची नोटीस मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यंना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी जाऊ शकल्या नव्हत्या.