दीपक परब
अभिनेत्री पल्लवी सुभाषला वकील बनायचे होते. तिला कायद्याची पदवीही घ्यायची होती, पण त्याआधीच तिने एका नाटकात काम केले आणि वकील बनण्याचे स्वप्न तिने बाजूला ठेवले. पल्लवी सुभाषने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. ती ३९ वर्षांची झाली. पल्लवी सुभाषने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. यानंतर या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव गाजवले.
पल्लवीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. दक्षिणेतील सर्व भाषांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव येते. एवढेच नाही, तर या अभिनेत्रीने श्रीलंकन चित्रपटातही काम केले आहे. पल्लवीने ग्लॅमरच्या दुनियेत टीव्ही मालिकेने सुरुवात केली होती. तिने एका मराठी मालिकेत काम केले होते. त्यानंतर ती साऊथकडे वळली. यावेळी एकता कपूरने अभिनेत्रीच्या कामाची दखल घेतली आणि तिच्या ‘करम अपना अपना’ या मालिकेत मुख्य भूमिका दिली. याशिवाय ती ‘कसम से’, ‘बसेरा’, ‘गोदभराई’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली. टीव्ही शो करताना, या अभिनेत्रीने मराठी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आणि अनेक हिट चित्रपट दिले. मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर पल्लवीने तेलुगू आणि कन्नडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर अभिनेत्रीने श्रीलंकन भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलेबी कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाषला नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर कला क्षेत्रात तिचा प्रवास सुरू झाला. ‘तुम्हारी दिशा’ या मालिकेमार्फत तिने पदार्पण केले. त्यानंतर एकता कपूर यांनी तिला हात दिला व ‘करम अपना अपना’ या मालिकेत गौरी या पत्रासाठी तिला निवडले, त्यानंतर तिने अनेक मालिकांमधून काम केले.
चित्रपट कुंकु झाले वैरी या २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामार्फत त्यांनी चित्रपटात पदार्पण केले, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी आयला रे, अशी मी अशी ती, प्रेमसूत्र, धावा धावा खून खून या मराठी भाषेतील चित्रपटासोबत इतर चित्रपटात काम केले.
अभिनेत्री नयनताराचे शुभमंगल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधून, आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. दोघांनी एकमेकांना सात वर्षे डेट केले होते आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला पती-पत्नीचे नाव दिले आहे. नयनताराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी लग्नाच्या विधीदरम्यान खूप धमाल केली. एकमेकांना हार घालताना दोघांची खट्याळ शैली समोर आली आहे. विघ्नेश शिवनने लग्नात नयनताराला मंगळसूत्र घातले तेव्हाचा क्षण लोकांचे लक्ष वेधून घेत होता. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा विवाह चेन्नईच्या महाबलीपुरम येथे कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला.
भोजपुरी ललनेची भात लावणी
मान्सून आल्याची खबरबात काहींना आधीच कळलेली दिसते. कारण शेतीची कामे सुरू झाली असून काही ठिकाणी भात लावणी करणे सुरू झाले आहे. त्यात भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नसतो. सुषमा अधिकारी या भोजपुरी अभिनेत्रीचा देखील इंडस्ट्रीत असाच जलवा आहे. सुषमा हे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव. सुषमा भोजपुरीसह नेपाळी सिनेमांमध्ये देखील काम करते. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. सुषमाने भात लावणी करतानाचे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.