Sunday, October 26, 2025
Happy Diwali

जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या -राज ठाकरे

जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या -राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा १४ जूनला वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

सध्या राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढले असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. या वाढदिवसामुळे गर्दी होणार त्यामुळे संसर्ग होउन शस्त्रक्रिया आणखी पुढे जाता कामा नये म्हणून राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट करत राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1535963415583535104

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर ऑडियो पोस्ट करत कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन केले आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "१४ तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

Comments
Add Comment