मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीच्या संजय पवार यांना धूळ चारली. फडणवीसांच्या व्यूहरचनेमुळे संजय पवार यांचा पराभव झाला असून तो आघाडीच्या जिव्हारी लागला आहे. आता यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही याचे पडसाद उमटणार आहेत.
महाराष्ट्राचे चाणक्य कोण हे सांगायचे झाल्यास राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे चाणक्यच असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या आमदारांबरोबर अन्य पक्षांच्या आमदारांमध्येही फडणवीस यांनी विश्वास निर्माण केले असल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी एका सामान्य शिवसैनिकाचा बळी का घेतला? त्यांनी संजय राऊतएवजी संजय पवार यांना पहिल्या क्रमाकांची मते का दिली नाही? संजय राऊतांमुळे संजय पवारसारख्या निष्ठावंत शिवसैनिकाचा बळी गेला आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्यसभा निवडणूकीत मॅन ऑफ द मॅच असणार हे आपण कालच सांगितले होते आणि आजच्या निकालातून ते दिसून आले आहे.