Saturday, October 18, 2025
Happy Diwali

राज्यपाल रोहित पवारांमुळे मविआचीपण अडचण

राज्यपाल रोहित पवारांमुळे मविआचीपण अडचण

मुंबई : राज्यपाल रोहित पवारांनी भाजपवर आरोप करण्याऐवजी आपल्या आजोबांकडे लक्ष द्यावे. कारण आजोबा नेमके काय करतात, हे कुणालाच सांगत नाहीत. त्यामुळे तुमच्याबरोबर महाविकास आघाडीचीही अडचण झाली आहे, असा खोचक टोमणा भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपचा विजय झाल्यानंतर रोहित पवारांनी या निवडणूक प्रक्रियेवर आणि भाजपने वापरलेल्या दबाव तंत्रावर टीका केली होती. रोहित पवार हे राज्यपाल असल्याप्रमाणे प्रतिक्रिया देत आहेत, त्यामुळे निलेश राणे यांनी थेट रोहित पवारांना राष्ट्रवादीचे राज्यपाल म्हणत त्यांना टोमणे मारले आहेत. ट्विटरद्वारे निलेश राणेंनी ही टीका केली.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1535871985489952768

भाजपावर आरोप करणाऱ्या रोहित पवारांना निलेश राणेंनी ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. तुम्ही भाजपवर आरोप करण्याआधी तुमच्या आजोबांकडे लक्ष द्या. ते काय करतात, हे कुणालाही सांगत नाहीत, त्यामुळे मविआची अडचण झाली आहे, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment