Saturday, July 5, 2025

१८ जूनपासून बारावीच्या गुणपत्रिका शाळा महाविद्यालयातून मिळणार

१८ जूनपासून बारावीच्या गुणपत्रिका शाळा महाविद्यालयातून मिळणार

अमरावती (हिं.स.) मार्च, एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८ जूनला ऑनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि तपशीलवर गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण विभागातील पाचही जिल्ह्यात १८ जूनपासून संबंधित शाळा-महाविद्यालयात होणार आहे.


विभागातील पाचही जिल्ह्यांतील बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण करण्याबाबतचे नियोजन शिक्षण मंडळाने केले आहे.यानुसार १७ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यातीलमहाविद्यालयांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण मंडळाने नेमून दिलेल्या केंद्रावर केले जाणार आहे.


त्यानंतर सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत १८ जूनला दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरणकरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment