प्रोफेशनॅलिझम

डॉ. मिलिंद घारपुरे


एक सकाळी मित्राकडे आलो. फोन करून वाट बघत सोसायटीच्या गेट बाहेर मी उभा. आपोआप हात मोबाइलकडे. क्षणभर जरी तुम्ही निरुद्योगी झालात की व्हॉट्सअॅप, फेसबुक चालू. सिग्नलला अर्धा, एक मिनिट गाडी थांबली तरीही असंच.
तर... अगदी तसाच मी फेसबुक आणि मित्राची वाट 'बघत' उभा.


छान अवाढव्य सोसायटी. मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत तीव्र उतार. मराठीत त्याला slope म्हणूयात. दोन सफाई कामगार झाडत झाडत चाललेले. तरुण पुढे आणि एक वृद्ध बराचसा मागे झाडत झाडत पुढे गेलेल्या त्याच्या ज्युनिअरला या म्हाताऱ्याने अचानक दोनदा हाक मारली. मग एक शेलकी शिवी हासडून तिसऱ्यांदा जोरात हाक मारली आणि वरच्या सुरात...


"अरेsssss त्या उतारावर पडलेलं फाटकं प्लास्टिक उचल आधी, सुटलं तुझ्याकडून... अरे दुचाकी जोरात जातात, पोरं खेळतात पळतात, सायकली हानतात, कोणी घसरून धाडकन पडलं, तर धरून हाणीन तुला!!"


साधं वाक्य... वाक्यामागचा विचार दखल घ्यायला लावणारा. एका अशिक्षित किंवा अर्धशिक्षित सफाई कामगाराकडून.
आपल्या कर्तव्यामागची जबाबदारीची जाणीव असणं, ती समर्थपणे ती पेलता येणं... आणि कोणी तुमच्यावरती लक्ष ठेऊन नसतानाही इमानदारीने काम करणं.


थोडक्यात 'पाट्या' न टाकणं!!


जिवंत उदाहरण, ‘प्रोफेशनॅलिझम आणि कर्तव्यदक्षतेचं!’ कुठल्याही एमबीएमधील Roles and responsibilities च्या धड्यात नसलेलं!!!

Comments
Add Comment

सागरी महासत्तेच्या दिशेने वाटचाल...

इंडिया मेरीटाईम समिट म्हणजे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विविध सागरी परिषदांची एकत्र गुंफण होय. या

गावांचा कायापालट अन् देशाचा विकास

भारत देशातील गावांमध्ये हस्त उद्योगांचा ऱ्हास झाल्याने गावांचा विकास खुंटला. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने

'कामगार कायदे संहिता' एक परिवर्तनकारी पाऊल

जयपूरमधील डिलिव्हरी सेवा असो. साणंदमधील तंत्रज्ञान सेवा असो अथवा गुवाहाटी येथील बांधकाम व्यवसाय असो. सर्व

नक्षलवादी आले मुख्य प्रवाहात...

वर्षानुवर्षे जंगलात फिरणारे अनेक नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात परत येऊ इच्छितात आणि शांततापूर्ण जीवन जगू

'मालवणी'ला प्रतिष्ठा देणारा नाटककार

मालवणी नाटकांचा पाया रचणारे आणि या भाषेला जागतिक मंच देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले.

माहिती तंत्रज्ञान उजळवतेय शिक्षणक्षेत्र

इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रातही माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून एक प्रकारची क्रांती अनुभवायला