Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यप्रोफेशनॅलिझम

प्रोफेशनॅलिझम

डॉ. मिलिंद घारपुरे

एक सकाळी मित्राकडे आलो. फोन करून वाट बघत सोसायटीच्या गेट बाहेर मी उभा. आपोआप हात मोबाइलकडे. क्षणभर जरी तुम्ही निरुद्योगी झालात की व्हॉट्सअॅप, फेसबुक चालू. सिग्नलला अर्धा, एक मिनिट गाडी थांबली तरीही असंच.
तर… अगदी तसाच मी फेसबुक आणि मित्राची वाट ‘बघत’ उभा.

छान अवाढव्य सोसायटी. मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत तीव्र उतार. मराठीत त्याला slope म्हणूयात. दोन सफाई कामगार झाडत झाडत चाललेले. तरुण पुढे आणि एक वृद्ध बराचसा मागे झाडत झाडत पुढे गेलेल्या त्याच्या ज्युनिअरला या म्हाताऱ्याने अचानक दोनदा हाक मारली. मग एक शेलकी शिवी हासडून तिसऱ्यांदा जोरात हाक मारली आणि वरच्या सुरात…

“अरेsssss त्या उतारावर पडलेलं फाटकं प्लास्टिक उचल आधी, सुटलं तुझ्याकडून… अरे दुचाकी जोरात जातात, पोरं खेळतात पळतात, सायकली हानतात, कोणी घसरून धाडकन पडलं, तर धरून हाणीन तुला!!”

साधं वाक्य… वाक्यामागचा विचार दखल घ्यायला लावणारा. एका अशिक्षित किंवा अर्धशिक्षित सफाई कामगाराकडून.
आपल्या कर्तव्यामागची जबाबदारीची जाणीव असणं, ती समर्थपणे ती पेलता येणं… आणि कोणी तुमच्यावरती लक्ष ठेऊन नसतानाही इमानदारीने काम करणं.

थोडक्यात ‘पाट्या’ न टाकणं!!

जिवंत उदाहरण, ‘प्रोफेशनॅलिझम आणि कर्तव्यदक्षतेचं!’ कुठल्याही एमबीएमधील Roles and responsibilities च्या धड्यात नसलेलं!!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -