Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

राऊत पराभवाचे खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात -देवेंद्र भुयार

राऊत पराभवाचे खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात -देवेंद्र भुयार

अमरावती (हिं.स.) : संजय राऊत शिवसेनेच्या पराभवाचं खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात, असे म्हणत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर पलटवार केला. पहिल्या क्रमांकाची ३३ मतं शिवसेनेच्या संजय पवारांना दिलेली आहेत तर धनंजय महाडिकांना २३ मतं मिळाली आहेत. म्हणजे दहा मतांचा फरक आहे. मग ही १० मते कुणाची आहेत…?, असा सवालही आ. भुयार यांनी उपस्थित केलाय.


दुसऱ्या पसंतीची मतं संजय पवारांना जेवढी मिळायला हवी होती, तेवढी मिळाली नाहीत, हे खरे आहे. मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे. सरकार स्थापन होण्याआधीपासून मी अजित पवारांसोबत आहे, शिवसेना नंतर सरकार स्थापन होण्यासाठी आल्याचा टोलाही भुयार यांनी लगावला.


नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ असा नाही कोणीतरी समोर फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला. आपली एक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलीय. पहिल्या फेरीची, पहिल्या क्रमांकाची ३३ मतं आम्हाला मिळालेली आहेत. २७ मतं ही भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांना मिळालेली आहेत. तसे म्हटले तर ३३ आणि २७ मध्ये फरक आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतं, तिसऱ्या पसंतीची मतं त्या गणितावरून जय विजय ठरत असतात, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment