Friday, October 24, 2025
Happy Diwali

नवी मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

नवी मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी नेरूळ परिसरातील जिमी पार्क इमारतीचा संपूर्ण भाग कोसळला.

या घटनेत सहा जण जखमी झाले. तर या इमारतीत १२ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर पाचजणांची सुटका करण्यात आली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेरुळ सेक्टर १७ येथील जिमी पार्क सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील रुममध्ये लादी बसवण्याचे काम सुरू होते.

हॅालमध्ये काम सुरू असतानाच सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. वरून पडलेल्या स्लॅबच्या वजनाने खालच्या माळ्यापर्यंत संपूर्ण हॅालचा भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >