Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीलक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन केले मतदान

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन केले मतदान

मुंबई, (हिं.स.) : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यंदा खंडित झाल्याने भाजपासह महाविकास आघाडीसाठी अटीतटीचा सामना झाला आहे. त्यासाठी प्रकृती ठीक नसतानाही भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे जगताप हे विधानभवनात पोहोचल्यानंतर त्यांना घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते.

पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्या देखील आज विधानभवनात अँब्युलन्सने दाखल झाल्या.

जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल होते. मधल्या काळात त्यांचा आजार इतका बळावला होता की, ते कोमातही गेले होते. दरम्यान, कोमातून बाहेर आल्यानंतर २ जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांची एकूण प्रकृती पाहता मुंबईला पाठविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. त्यांची एकूण अवस्था पाहिली तर जगताप यांच्या आरोग्यावर अधिकचा ताण येईल, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मात्र, पक्षादेश असल्याने आपण मतदानाला जाणार असे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ते पुण्याहून मुंबईला रवाना झाले.

आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एअर ॲब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईला जाण्याचा आमचा विचार होता. मात्र, सातत्याने हवामान बदल होत असल्याने त्यांना महामार्गानेच मुंबईला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार रस्ते मार्गे मुंबईला आलो.

चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनी आम्हाला प्रकृती ठीक असेल तरच या असे सांगितले होते. आम्ही लक्ष्मण जगताप यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो असे सांगितले. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असेही शंकर जगताप यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -