मुंबई (हिं.स) : महाराष्ट्राचे नवीन धर्मादाय आयुक्त म्हणून महेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कार्यालय वरळी येथे आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जामनेर येथून पूर्ण करून त्यांचा वकिली अभ्यासक्रम एस एस मणियार लॉ कॉलेज जळगाव येथून पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी १९८८ रोजी जामनेर कोर्ट येथे सिविल व क्रिमिनल या विषयात वकिली व्यवसाय सुरू केला.
त्यांची ११ फेब्रुवारी १९९७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली, सरकारी वकील म्हणून वाशिम जामनेर धुळे येथे २००६ पर्यंत त्यांनी काम केले. २ मे २००६ रोजी त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर त्यांनी नांदेड येथेही जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर मुंबई येथे कामगार न्यायालय, सिटी सिविल सेशन कोर्ट, मुंबई येथील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहिले.
त्याचप्रमाणे बुलढाणा नागपूर मुंबई हायकोर्ट येथे काम केल्यानंतर त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव बघून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सांगितले की माझ्या हातून धर्मादाय विभागात सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे महेंद्र महाजन यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…