रोम : गेल्या एका महिन्यात २९ देशांमध्ये मंकीपॉक्सचे एक हजार ८८ रुग्ण आढळले आहेत. या उद्रेकाच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने लैंगिक संपर्काद्वारे समलैंगिक पुरुषांमध्ये विषाणू पसरत असल्याची भीती व्यक्त केली होती. युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनात याचा पुरावा सापडला आहे.
‘युरोसर्व्हिलन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात इटलीमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्सच्या चार रुग्णांची तपासणी करण्यात आली. ते सर्व समलैंगिक संबंध ठेवणारे पुरुष होते. त्यांचे वय ३० च्या आसपास आहे. मे महिन्यात तीन रुग्ण स्पेनमध्ये रेव्ह पार्टीसाठी गेले होते तर चौथ्याने सेक्स वर्कसाठी प्रवास केला होता.
हे चारही पुरुष लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, म्हणजे लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) यांना कधी ना कधी बळी पडले आहेत आणि यापैकी दोन लोक एचआयव्ही रुग्ण आहेत. या पुरुषांच्या वीर्यामध्ये मंकीपॉक्सचे विषाणू आढळून आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
जगभरातल्या प्रकरणांमध्ये, बहुतेक पुरुषांच्या शरीराच्या खासगी भागात पू भरलेले मुरुम येतात, हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. मंकीपॉक्स हा लैंगिक संक्रमित आजार आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. डेव्हिड हेमन म्हणतात की, या संशोधनाचे परिणाम महत्त्वाचे आहेत; परंतु या क्षणी मंकीपॉक्स हा लैंगिक आजार मानणे खूप घाईचे होईल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…