Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाविलेपार्लेच्या इशिता रेवाळेची रौप्य पदकाची कमाई

विलेपार्लेच्या इशिता रेवाळेची रौप्य पदकाची कमाई

मुंबई (हिं.स) : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत वैयक्तीक आठवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा चषक मिळवण्यास हातभार लावला.

कठीण आर्थिक परिस्थितीत वडिलांचे अथक परिश्रम व श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड व पूर्व प्रशिक्षक हरीष परब, विदेश दबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -