Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपृथ्वीराज पाटीलला उदयनराजे देणार बुलेट भेट

पृथ्वीराज पाटीलला उदयनराजे देणार बुलेट भेट

सातारा : महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि उपविजेता पैलवान प्रकाश बनकर यांना उदयनराजे मित्र परिवाराकडून जाहीर करण्यात आलेल्या बक्षिस वितरणासाठी आज मुहूर्त लागला. उदयनराजे यांच्या विजेत्यांना बुलेट, मोटरसायकल तसेच रोख रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला जी बुलेट उदयनराजेंकडून दिली जाणार आहे. त्या बुलेटला खास नंबरही घेण्यात आला आहे. तो नंबर आहे एमएच-०९-जीबी-००७ या नंबरचे उदयनराजे यांच्या ताफ्यातील वाहने आहेत.

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा सत्कार होणार हा इतर सत्कारपेक्षा मोठा सत्कार असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज पाटील याने दिली आहे. घरातील लोकांकडून मला वाहन घेण्यासाठी नकार दिला जात होता. मात्र, उदयनराजे यांच्याकडून मला बुलेट मिळाली हे विशेष आहे. उदयनराजे यांचा ७ हा आकडा आहे, तोच आकडा माझ्या गाडीवर त्यांनी स्वतःहून पत्र देऊन दिला हा एक मोठा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचेही तो म्हणाला.

महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरीची लढत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने ५-४ च्या फरकाने मुंबई पश्चिमचे नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली होती. विशेष म्हणजे जवळपास २१ वर्षांनी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -