Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमी'शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार नक्की मतदान करतील'

‘शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार नक्की मतदान करतील’

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या माजी आमदार सदाभाऊंना विद्यमान आमदार मतदान करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सदाभाऊ खोत यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी भाजप त्यांचे समर्थन करणार आहे. त्यामुळे अधिकृत पाच उमेदवार आणि अपक्ष एक असे सहा उमेदवार भाजपचे निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. आज सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी यासंबंधी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -