Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

नुपूर शर्मासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

नुपूर शर्मासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, (हिं.स.) : विशिष्ट धर्मासंदर्भातील कथित टिप्पणी प्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांसह ९ जणांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. दिल्ली पोलिसांच्या साबर युनिटने याप्रकरणी एफआयआर दाखल केलाय.

याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्यासह नवीन कुमार जिंदल, पीस पार्टीचे शादाब जौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल सहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीणा आणि पूजा शकून यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय. एका वृत्तवाहिनीवरून डिबेटमध्ये तस्लीम रहमानी यांनी वारंवार चिथावणी दिल्यामुळे संतापलेल्या नपूर शर्मा यांनी कथित वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग झाले होते. अरब देशांनी नपूर यांच्या कथित वादग्रस्त टिप्पणीवर निषेध नोंदवला होता. त्यानंतर भाजपने नपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकले.

भाजपमधून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली. यासंदर्भात नुपूर म्हणाल्या की, 'मी माझे शब्द परत घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या बोलण्यानं कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द परत घेते.' नुपूर यांच्यावरील पक्षांची कारवाई आणि त्यांचा माफीनामा यानंतर त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Comments
Add Comment