मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अटकेत असलेले मंत्री अनिल देशमूख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यासाठी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. यामुळे देशमूख आणि मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.
मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मात्र, सर्वोच्च न्यायालयातही दोघांना फटका बसला आहे. परंतू अद्यापही न्यायालयाचे दोन तास बाकी आहेत. यामध्ये पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.