
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेत विविध मुद्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी ठाकरे यांनी सभेचे आयोजन केले होते. सभेनंतर मनसे आणि भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. तर, या सभेसाठी कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1534724961515884545
मनसेचे संदीप देशपांडे आणि कोकणातील आमदार नितेश राणे यांनी फोटो शेअर केला आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पैसे देत असल्याचे दिसत आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
हे आरोप झाल्यानंतर खैरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा फोटो जुना आहे, नितेश राणे यांना मी वडिलधारा आहे. त्यांनी किमान वय पाहून आरोप करावे, असे खैरेंनी म्हटले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1534807955790794752
मात्र यानंतर खैरे यांचा व्हिडीओ ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी 'अरे रे झोंबलं... सच कडवा होता है' आणि या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ काल संध्याकाळी संभाजीनगरकरांना सभेनंतर समजलाच असेल! असे दोन ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी खैरेंची पोलखोल केली आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1534737126805233666