मुंबई : कृपाशंकर सिंह यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करावा अशी विनंती करणारे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे.
उत्तर प्रदेशमधील अनेक तरुण महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात. तर अगोदर भूमिपुत्रांचा विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाते. असे असताना आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करण्याची विनंती केली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करावा अशी विनंती करणारे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी “अनेक उत्तर भारतीय लोक नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. मात्र मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात,” असा उल्लेख केला आहे.