पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (मार्च २०२२) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्यातून यंदा १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे.
राज्यातील बोर्डाच्या 9 विभागांपैकी कोकण विभाग 97.21 टक्क्यांसह अव्वल असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के, नागपूर विभागाचा 96.52 टक्के, औरंगाबाद 94.97 टक्के, कोल्हापूर विभाग 95.7 टक्के, अमरावती 96.34 टक्के, लातूर 95.25 टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के लागला आहे. राज्यातील 230769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असून 558678 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. राज्यातील 6455 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आहेत.