नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमान वाहतूक नियामक मंडळाने (डीजीसीए) विमान प्रवासात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांविरोधात आपली भूमिका कडक केली आहे. ज्या प्रवाशांनी मास्क घातलेले नाहीत त्यांनी मास्क घालावे आणि निघताना फ्लाइटमधून काढून टाकावे, असे त्यात म्हटले गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आली आहेत
डीजीसीए यांनी आज, बुधवारी सांगितले की सीआयएसएफ कर्मचारी मास्कचा नियम लागू करणार आहेत. याचे पालन करण्यास नकार देणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला विमानाच्या टेकऑफपूर्वी उतरवण्यात येईल. कोविड सुरक्षा उपायांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डीजीसीएची ही मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत.
गेल्या ३ जून रोजीच्या आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, कोरोना साथरोग अद्याप संपलेला नाही. आणि प्रवाशांनी वारंवार स्मरण करूनही प्रोटोकॉल पाळण्यास नकार दिल्यास आरोग्य मंत्रालय आणि डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल. न्यायालयाने म्हटले होते की अशा प्रवाशांना काढून टाकले जाऊ शकते, ‘नो फ्लाय’ यादीत टाकले जाऊ शकते किंवा पुढील कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देखील दिले जाऊ शकते.