टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्विकारणार

  93

मुंबई : कोवीड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि. १६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया बंद करण्यात आली होती. या विभागाच्या दि. ३० ऑगस्ट २०२१ च्या परिपत्रकान्वये सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय गार्डन गेट प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.


अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येणारी Visitor Pass Management System (VPMS) दि. १८ मे, २०२२ पासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. प्रवेशपास ठिकाणी टपाल स्विकृतीकरिता केलेली व्यवस्था बंद करण्यात आली असून टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्विकारले जाणार आहे. यानुसार सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी तसेच मंत्रालयीन नियंत्रणाखालील सर्व विभाग व कार्यालयांनी टपाल शक्य तो ईमेलद्वारे पाठवावे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. १८ मे, २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी