प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी ३१ मे वरुन मुदत वाढवून देवून ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.


जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे.


तरी या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बहुपत्नीत्वामुळे महिला संकटात

पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या