मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या आकडा वाढत चालला असून बुधवारी तब्बल कोरोना रुग्णसंख्या पावणे तीन हजारांच्या घरात गेली आहे. बुधवारी राज्यात २७०१ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर यापैकी १७६५ कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
राज्यात बुधवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३२७ आहे, तर यातील ७३९ रुग्ण हे मुंबईचे आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८ टक्के आहे, तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ही ७००० एवढी झाली आहे.
मुंबईत रुग्ण वाढीचा दर देखील वाढला असून कोविड दुप्पटीचे दिवस कमी झाले असून ८६६ झाले आहेत.
देशात ५२३३ नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णसंख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली असून महाराष्ट्रात २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णसंख्येने मागील ९३ दिवसानंतर पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी ५२३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णसंख्येसह सध्या देशात २८ हजार ८५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपासून देशात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बुधवारी देशात ५२३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ४१ टक्क्यांनी जास्त आहे. या रुग्णवाढीमुळे आता चिंता व्यक्त केली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.