नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३ हजार ७१४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २,५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सोमवारी ४,५१८ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यातुलनेत आज काहीशी कमी नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २६ हजार ९७६ सक्रिय कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत ५ लाख २४ हजार ७०८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर ४ कोटी २६ लाख ३३ हजार ३६५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुन्हा एकदा लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत १९४ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.