पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ८ जून रोजी जाहीर होणार आहे.
यावर्षी राज्य बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेतली होती. परीक्षा शांततेत पार पडल्यानंतर पेपर तपासणीचे मोठे आव्हान बोर्डापुढे होते. परंतु, या काळात कोरोनाची साथ नियंत्रणात राहिल्यामुळे व्हॅल्युएशनचे काम देखील व्यवस्थित पार पडले. सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्यानंतर आता बुधवारी ८ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
कोविड -१९ महामारी काळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची ऑफलाइन परीक्षा झाली असल्याने या निकालाची अधिक उत्सुकता आहे. मागील वर्षी राज्यातल्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे त्यांच्या नववी ते अकरावीच्या गुणांच्या आधारे विशिष्ट सूत्रानुसार मूल्यांकन करण्यात आले होते.
या संकेतस्थळांवर ऑनलाइन निकाल पाहता येईल
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in