पुणे : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुण्यातून कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. सौरभ महांकाळ आणि संतोष जाधव अशी संशयितांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येपाठीमागे काय गुपित आहे. हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता हे कनेक्शन पुण्यातून असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधव मंचरचा सराईत गुन्हेगार आहे. ओंकार उर्फ रानिया बाणखेलेच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरु आहे. हे दोघेही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील असल्याचे समोर आले आहे. मुसेवालाची हत्या करण्यासाठी चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. ३ शूटर्स पंजाबमधून, २ महाराष्ट्रातून, २ हरियाणातून आणि यातील एक शूटर्स हा राजस्थानचा होता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल दिली होती.