विलास खानोलकर
मैंदर्गीच्या एका ब्राह्मणास दोन मुलगे आणि तीन मुली अशी पाच अपत्ये होती. ती सर्वच वेडगळ होती. पुढे तो ब्राह्मण त्याची पत्नी आणि चार अपत्ये मृत्यू पावली. ‘मन्या’ नावाचा एक मुलगा मात्र जिवंत राहिला. तो मुका आणि वेडा होता. पंचवीस-तीस वर्षे तो मैंदर्गी गावीच होता. तो निराधार स्थितीत कोठेही खात असे, कोठेही निजत असे, कोठेही बसत असे.
मैंदर्गीची काही मंडळी जेव्हा अक्कलकोटास आली तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर मन्याबासही आणले. सर्वांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन्याबासही आणले. सर्वांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन्याबास श्री स्वामींच्या पायावर घातले. तेव्हा महाराज मन्याबास म्हणाले, ‘दिवाना, क्या होना रे?’ परंतु ‘महाराज, त्याला काय समजते?’ सोबत आलेली मंडळी म्हणाली, ‘महाराज, त्याचे वेड घालवा’ असेही ते म्हणाले. त्यावर श्री स्वामी महाराज काहीच बोलले नाहीत. ती सर्व मंडळी दोन दिवस राहून मैंदर्गीस परत गेली. मन्याबा मात्र अक्कलकोटातच १५ वर्षे राहिला. काही वर्षांनी श्रीस्वामी समर्थांच्या कृपेने मुका असलेला मन्याबा मराठी आणि कानडी बोलू लागला. तो लोकांच्या नवसासही पावू लागल्यामुळे लोक त्याला मान देऊ लागले. कोणाचे काम होणार असेल तर तो ‘होईल’ असे म्हणे. होणार नसेल तर ‘नाही रे’ असे म्हणे. जर कोणी त्यास विचारले की, होईल असे का म्हणत नाहीस? त्यावर तो उत्तर देई की,‘स्वामी मारील.’ श्री स्वामी समर्थ कृपेने त्यास भूत-भविष्य कळते. स्वामीकृपेने बोलू लागला.
स्वामीकृपे मुका लागला बोलू
प्रश्न-उत्तरे हृदयातले लागे खोलू ।।१।।
स्वामी म्हणती नको भिऊ
घाबरू नको भक्त भाऊ ।।२।।
मी तुझ्या पाठी नको तू भिऊ
आयत्या वेळी नको कच खाऊ।।३।।
आपले प्राक्तन आपण लीहू
दिनरात्र कष्ट करून पाहू ।।४।।
पुण्याईचे बिऱ्याड पाठीवर वाहू
पुण्याईचे पेरू, तांदूळ, गहू ।।५।।
लाख पेरू दहा येई वरू
आर्थिक संपन्नतेचा वाहे झरू ।।६।।
हाती दत्ताचा झेंडा धरू
भूत पिशाच्चाला दत्तनामाने मारू ।।७।।
रामनामाने राक्षसाना मारू
सोडू वाईट विचार तंबाखू दारू ।।८।।
मनामधे ईश्वराला स्मरू
येईल तारायास स्वामीगुरु।।९।।
कामाचे घर मंदिर फिरू
दुःख लागेल हवेत वीरू ।।१०।।
प्रगती होईल जोमाने सुरू
आत्म प्रगतीचा रस्ता धरू।।११।।
मातापिता खूष करू
बंधुभगिनी गरीब खूष करू ।।१२।।
लुळे पांगळे मदत करू
अंधाची काठी हाती धरू।।१३।।
झाडे-बीया लावत डोंगर फिरू
निसर्गसंपदा लागे जोर धरू ।।१४।।
मी (तुझ्या) पाठीशी आहे गुरू
स्वामी समर्थ नाम घे दत्तगुरू ।।१५।।
स्वामीकृपे बदलेल जीवन
होईल सुंदर आनंदी जीवन।।१६।।