मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. येत्या ८ जूनला राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हनुमान चालीसा प्रकरणावेळी जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. आम्ही खासदार आमदार आहोत, तुम्ही आम्हाला असे थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले होते. त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून एक गुन्हा दाखल झाला होता. त्या संबंधित ही नोटीस मुंबई पोलिसांनी त्यांना बजावली आहे. याप्रकरणी येत्या ८ जून रोजी राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.