मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. येत्या ८ जुन रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे.
मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही राष्ट्रवादीचे नेते असून आगामी राज्यसभा निवडणुकीत आमदार म्हणून मतदानाचा हक्का बजावता यावा, यासाठी दोघांनीही न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे दोन्ही नेते आर्थर रोड जेलमध्ये आहेत.