Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेची ‘अमृत’ कामगिरी

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेची ‘अमृत’ कामगिरी

आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचा सन्मान

ठाणे (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान २०२२ अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.

पंचतत्त्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या या स्पर्धेत “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर कोकण विभागात अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पर्यावरणदिनी टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरिमन पाइंट, मुंबई येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यास अतिरिक्त नगर अभियंता अजुर्न अहिरे, उपआयुक्त मारुती खोडके, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विनोद पवार, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, सेवाभावी संस्था प्रतिनिधी भटू सावंत उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, शिक्षण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग व इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती. सर्व माहिती संकलन करून शासनाच्या पोर्टलवर सादर करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण विभागाने यशस्वीपणे सांभाळली. ठाणे महापालिकेस प्राप्त झालेल्या या सन्मानामुळे महापालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची दुसऱ्या क्रमांकाची झेप

कल्याण : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने २२ क्रमांक ओलांडून सोळावा क्रमांक पटकावला असून हाई जंप श्रेणीचे द्वितीय पारितोषिक महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर महापालिकेने अमृत श्रेणी अंतर्गत ५५०० पैकी एकूण ३३७१ गुणांसह १६ वा क्रमांक पटकावला आहे. या श्रेणीमध्ये महानगरपालिकेने रँकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सर्वोच्च, अतुलनीय कामगिरी करून थेट १६ व्या स्थानी झेप घेतली असल्यामुळे, महापालिकेस हाय जंप श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने टाटा थिएटर, एनसीपीए मुंबई येथे रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवन पल्ली, उपायुक्त अतुल पाटील, माजी उपायुक्त रामदास कोकरे, संजय जाधव उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -