Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीहॉर्न वाजवला तर १०००० आणि हेल्मेट घातले असले तरी २००० रुपयांचा दंड

हॉर्न वाजवला तर १०००० आणि हेल्मेट घातले असले तरी २००० रुपयांचा दंड

नवीन वाहतूक नियमांमुळे वसुली वाढली!

नवी दिल्ली : जरा कुठे रस्त्यावर गाड्या थांबल्या, थोडेजरी ट्राफिक जाम झाले तर सर्व वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवून त्रास देतात. अशा वाहन चालकांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार आता हॉर्न वाजवल्यास तब्बल १० हजार रुपयांचे चालान कापले जाऊ शकते.

देशात कितीही कडक नियन केले तरी या वाहतुकीच्या नियमांना अनेक वाहनचालक केराची टोपली दाखवतात. हॉर्न वाजवणे, सिग्नल तोडणे आणि रॅश ड्रायव्हिंग तर आपल्याकडे अनेक ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र आता चौकाचौकात लावलेले कॅमेरे आणि पोलिसांकडे असलेल्या मोबाईलमधून फोटो कडून संबंधित वाहनाच्या मालकाला त्याच्या मोबाईलवर थेट दंड भरण्याचे चालान पाठवले जाते. या नवीन वाहतूक नियमांमुळे वाहतूक पोलिसांची वसुली वाढली असून सर्व वाहनचालकांना मात्र ते तापदायक ठरत आहे.

मोटार वाहन कायदा नियम ३९/१९२ नुसार, जर तुम्ही मोटारसायकल, कार किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना प्रेशर हॉर्न वाजवला तर तुमच्याकडून १०,००० हजार रुपयांचा दंड (चालान) आकारला जाऊ शकतो. यासोबतच तुम्ही जर सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजवल्यास नियम १९४ एफ नुसार तुम्हाला २००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुम्ही मोटरसायकल, स्कूटर चालवताना हेल्मेट घातले आहे, परंतू स्ट्रिप बांधली नसेल, तर मोटार वाहन कायदा नियम १९४ डी नुसार तुमच्याकडून १००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. किंवा जर तुम्ही सदोष हेल्मेट (बीआयएस शिवाय) घातले असल्यास तुमच्याकडून १००० रुपयांचा दंड आकारला जाईल. याचाच अर्थ तुम्ही हेल्मेट घातले असले तरी त्याबाबतचे नियम न पाळल्यास तुम्हाला २००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

चालान भरण्यासाठी परिवहन विभागाची वेबसाईट

https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. तिथे चालानशी संबंधित आवश्यक माहिती आणि कॅप्चा भरा आणि गॅट डिटेल्स वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यावर चालानचे डिटेल्स दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची पुष्टी करा. आता तुमचे ऑनलाइन चालान भरले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -